Loading...
Joshaba Foundation School
About Us

जोशाबा फौंडेशन व मतिमंद निवासी विद्यालय

"जोशाबा फौंडेशन" हि एक सेवाभावी संस्था असून मा. श्री. राजेश घोडके यांच्या स्वयंप्रेरणेतून या संस्थेचा जन्म झाला. जन्म घेणारा माणूस हा सर्वांगाने सदृढ असेल असे नाही. काही वेळा काही विचित्र समस्या निर्माण होऊन नकळत्या वयात मतिमंदत्व पदरात पडलेली मुले, त्यांचा काही दोष नसताना देखील समाजात उपेक्षित राहिलेली दिसतात. हे वास्तव सुजाण मानवाला नक्की बोचणारे आहे.

आजमितीला बदलत्या जीवनशैलीमुळे मतिमंदांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हे वास्तव जाणून काहीतरी करण्याची इच्छा मनी बाळगून श्री. राजेश घोडके यांनी २००३ सालापासून प्रयत्न सुरु केले. समाजातील विविध स्तरातील घटकांना जोडत, अथक प्रयत्नांनी त्यांनी "जोशाबा फौंडेशन" हि संस्था २००५ साली सुरु केली.

या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. परंतु त्यांचे खरे ध्येय हे "मतिमंदांचे पुनर्वसन" या बिंदू भोवती केंद्रित राहिले. २०११ साली त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि पंढरपुरात पहिली कायम विनाअनुदानित मतिमंद शाळा वाखरी येथे सुरु झाली. आज या मतिमंद शाळेत ४० निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या अंधारलेल्या आयुष्याला उजळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

स्थापना: २००५

विद्यार्थी संख्या: ४०+

पहिली विनाअनुदानित शाळा

निवासी व्यवस्था

Admission

प्रवेश पात्रता व अटी

प्रवेशासाठी खालील कागदपत्रे व अटी आवश्यक आहेत:

  • किमान ४०% मतिमंदत्वाचे, सिव्हील सर्जनचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
  • वय किमान ६ ते १६ वर्षे असणे आवश्यक.
  • पालकांचे संमतीपत्र.
  • रहिवाशी दाखला (Residence Proof).
  • ओळखपत्र (Aadhar Card/ID Proof).
आमची शाळा (Our School)

मतिमंद निवासी विद्यालय, वाखारी

School Building
मुख्य इमारत (Main Building)
Students
आमचे विद्यार्थी
Classroom
अध्ययन कक्ष